बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारत आणि पाकिस्तान टी20 विश्वचषकात भिडणार; सामन्याबाबत मोठी माहिती समोर

मुंबई | क्रिकेट म्हणजे भारतात एक प्रकारचा उत्सवच असतो आणि त्यात भारत आणि पाकिस्तान यांचा सामना असेल तर ‘सोने पे सुहागा’. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना पाहायची संधी गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटप्रेमींना क्वचितच मिळाली. त्यातच आता पुन्हा ‘फिरसे मोका मोका’ म्हणण्याची संधी मिळणार आहे. कारण भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा टी20 विश्वचषकात भिडणार आहेत.

भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघाचा सामना आगामी आयसीसीच्या टी-20 विश्वचषकात रंगणार आहे. आयसीसीकडून शुक्रवारी या स्पर्धेतील सुपर-12 आणि पहिली फेरी या दोन्हींची गटवारी जाहीर करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान दे दोन्ही संघांना दुसऱ्या गटात सामिल करण्यात आलं आहे. त्यामुळे आता टी-20 विश्वचषकात एकतरी भारत पाकिस्तान लढत आता निश्चित झालीये.

टी-20 विश्वचषक स्पर्धा येत्या 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ओमान व यूएई या देशांमध्ये खेळवण्यात येणार आहे. पहिल्या म्हणजेच अ गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांसारखे धुरंदर संघ असणार आहेत. तर दुसरीकडे ब गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान हे संघ असणार आहे.

दरम्यान, दोन्ही गटाच्या तुलनेत पहिला गट अधिक तगडा आहे. त्यामुळे या गटातील सामने आणखी रोमांचक होतील. ब गटात भारताला न्यूझीलंड हा मजबूत संघ तगडी टक्कर देऊ शकतो. या दोन्ही गटातील सर्वाधिक सामने जिंकणारे 2-2 संघ दुसऱ्या फेरीत म्हणजे सेमिफायनलमध्ये खेळणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“मोदींच्या सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क उतरवण्यात आले, कलियुग म्हणतात ते हेच का?”

“राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार, पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री होणार”

हर्षवर्धन पाटलांच्या चुलत भावाचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश!

“स्वप्नीलच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना भेटायला जावं लागलं, हे निबर कातडीचं सरकार”

‘ही’ अभिनेत्री लवकरच करणार कमबॅक; दाऊदसोबतच्या संबंधांमुळे आली होती चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More