कुलभूषण जाधवप्रकरणी हरीश साळवेंची फी १ रुपया!

नवी दिल्ली | कुलभूषण जाधव प्रकरणी भारतातर्फे आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी अवघी १ रुपया फी घेतलीय. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय.

साळवे देशातील सर्वात महागडे वकील म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ट्विटरवरील एका यूझरने साळवे यांच्या फीमध्ये दुसरा एखादा चांगला वकील देता आला नसता का? अशी विचारणा केली होती. तेव्हा स्वराज यांनी साळवे यांच्या फीचा खुलासा केला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या