ऐन निवडणुकीत दुःखद बातमी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराचं निधन

Harishchandra Chavan passed away

Harishchandra Chavan | दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज 14 नोव्हेंबररोजी सकाळी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. अखेर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपसाठी ही वाईट बातमी समोर आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. (Harishchandra Chavan)

मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून हरिश्चंद्र चव्हाण यांनी गेली अनेक वर्षे काम केलं आहे.पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्येही त्यांनी पदे भूषवली आहेत. भाजपशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

दिंडोरीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी एअर अँब्युलन्सने ते दिल्ली येथे गेले होते. पक्षाने 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना तिकीट दिले नव्हते. मात्र, तरीही ते भाजपसोबत एकनिष्ठा राहून सतत पक्षासाठी कार्य करीत राहिले.

हरिश्चंद्र चव्हाण यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2014 मध्ये त्यांनी भारती पवार यांचा 2 लाख 47 हजार मतांनी पराभव केला होता. भारती पवार तेव्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणूक लढल्या होत्या. तर, 2019 मध्ये त्या भाजपमध्ये आल्या. (Harishchandra Chavan)

हरिश्चंद्र चव्हाण यांची कारकीर्द

यानंतर भाजपने हरिश्चंद्र पवार यांना उमेदवारी न देता भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी 1 लाख 98 हजार 779 मतांनी विजय मिळवला होता. तर, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हरिश्चंद्र चव्हाण हे इच्छुक होते.

मात्र, 2024 च्या निवडणुकीतही भाजपने भारती पवार यांनाच संधी दिली.यानंतर हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी दिंडोरी लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आरोग्याचा प्रश्न समोर करत त्यांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन झाल्याने दिंडोरीवर शोककळा पसरली आहे. (Harishchandra Chavan)

News Title –  Harishchandra Chavan passed away

महत्त्वाच्या बातम्या-

“तुम्ही ज्यावर प्रेम केलं, तो सूरज आता तसा नाही…”; कोकण हार्टेड गर्लने वादावर मौन सोडलं

मोठी बातमी! नितीन राऊत यांच्या कारचा भीषण अपघात, प्रचारावरून परततानाच..

“सर्वांनी मिळून माझा लोकसभेत पराभव केला”; नवनीत राणांचं महायुतीलाच आव्हान

“स्वतःला मर्द समजणाऱ्या ठाकरेंच्या बॅगमध्ये लिपस्टिक-लाली..”; नितेश राणेंची खोचक टीका

आज वैकुंठ चतुर्दशी, श्रीहरी व महादेवाची कृपादृष्टी कुणावर असणार?; वाचा राशीभविष्य

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .