बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोकादायक! जास्त फळं खाल्यानं ‘या’ अवयवांवर होऊ शकतो परिणाम

नवी दिल्ली | आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपण प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कर्बोदकांसारखे आवश्यक पौष्टिक तत्वांनी परिपूर्ण असलेला आहार घेणं महत्वाचं मानत असतो. यातच फळं खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे घरातले मोठे नेहमी फळं खाऊ घालण्यावर भर देताना सर्सास पहायला मिळतात. मात्र हे फळं खाणंही कधीधी हानिकारक ठरु शकतं.

इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, फ्रुक्टोज सामान्यतः फळे आणि मधात आढळतात. जर शरीरात फ्रुक्टोजचे प्रमाण वाढलं तर त्याचा शरिराच्या अवयवांवर विपरीत परिणाम होऊ लागतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हे सर्वात जास्त हानिकारक ठरू शकतं.

फ्रुक्टोजचं जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे मेंदुवर परिणाम होतो. यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. फ्रुक्टोजचे सतत सेवन केल्यानं लेप्टिन हार्मोनचे संतुलन बिघडतं, ज्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते. जास्त फ्रुक्टोडमुळे ग्लुकोजचे प्रमाणही वाढतेे.

दरम्यान, फळं खाल्यानं शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढत असते. अनेक प्रकारचे जीवनसत्वे मिळत असतात. मात्र ही फळही जास्त प्रमाणात खाल्यावर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जास्त प्रमाणात फळांचं सेन केल्यास त्याचा परिणाम आपल्या अवयवांवर होत असतो.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! महाराष्ट्र बंदमुळे पुण्यातील PMPML प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

“लखीमपूरची चर्चा करूच पण इथल्या शेतकऱ्यांना मदत कधी देणार?”

चिंताजनक! मुंबईमध्ये पुन्हा कोरोना फोफावण्याचा धोका

राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे!

‘मी त्यालाही ओळखत नाही आणि कुठल्या अभिनेत्यालाही ओळखत नाही, पण…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More