धोकादायक कॉम्बिनेशन! चहासोबत सिगारेट ओढताय? मग आताच सावध व्हा!

smoking cigarette with tea

Smoking | अनेकांना चहा पिताना त्यासोबत सिगारेट ओढण्याची सवय असते. काहींसाठी ही फॅशन असते, तर काहींना ते एकप्रकारचे व्यसनच जडलेले असते. मात्र, चहासोबत सिगारेटचे झुरके मारणे हे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. या सवयीमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. आज आपण चहासोबत सिगारेट ओढल्याने होणाऱ्या संभाव्य आजारांबद्दल जाणून घेणार आहोत. (Smoking )

चहा पित असताना सिगारेट ओढणे हे अनेकांना आनंददायी वाटत असेलही, पण ही रोजची आणि वारंवारची सवय तुमच्या जीवावर बेतू शकते. सुरुवातीला याचे परिणाम जाणवणार नाहीत, पण हळूहळू याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागतो.

आरोग्यासाठी हानिकारक कॉम्बिनेशन

तज्ज्ञांच्या मते, धूम्रपानाची सवय (Smoking Habit) असलेल्या लोकांना चहासोबत सिगारेट ओढण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. मात्र, चहा आणि सिगारेटचे कॉम्बिनेशन (Combination) शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. एकाच वेळी चहा आणि सिगारेटचे सेवन केल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे भविष्यात हृदयरोग (Heart Disease), कर्करोग (Cancer) यांसारख्या दुर्धर आजारांचा धोका वाढतो. (Smoking )

एका अभ्यासानुसार, चहा आणि सिगारेट एकत्र घेतल्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता तब्बल ३० टक्क्यांनी वाढते. चहा पिण्याने पचनसंस्थेवर (Digestive System) परिणाम होऊ शकतो, तर सिगारेटमधील रसायने शरीरातील पेशींना हानी पोहोचवतात. याशिवाय, या दोन्हीचे एकत्र सेवन केल्याने शरीरात आणखी काही गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

चहा आणि सिगारेटच्या या धोकादायक कॉम्बिनेशनमुळे खालील आजारांचा धोका वाढतो:

हृदयरोग
मेंदूला स्ट्रोक (Brain Stroke)
हात-पायांचा हर्निया (Hernia)
स्मृती कमी होणे (Memory Loss)
श्वासोच्छवासाचे विकार (Breathing Problems)
पचनाच्या समस्या (Digestive Problems)

एका सिगारेटमध्ये साधारणतः 6-12 मिलिग्रॅम निकोटिन (Nicotine) असते. सिगारेट ओढणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका सामान्य व्यक्तीच्या तुलनेत 2-3 पटीने जास्त असतो. सिगारेटमधील निकोटिन हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये संकुचन निर्माण करते. यामुळे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. (Smoking )

Title: harmful effects of smoking cigarette with tea

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .