बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक दे पट्टे! विराट कोहली, मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्सला बाद करत हरप्रीतने फिरवला सामना, पाहा व्हिडीओ

मुंबई | पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. मात्र या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे विराट कोहली, मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्सची विकेट. पंजाबच्या हरप्रीत ब्रारने आपल्या एकाच षटकात विराट कोहली आणि आक्रमक फलंदाज ग्लेम मॅक्सवेलला बाद केलं.

180 च्या लक्ष्याचा पाठलाग करणारा बंगळुरूचा संघ मजबुत स्थितीत होता मात्र हरप्रीतचं ते एक षटक सामना पालटून गेलं. त्यानंतर बंगळुरूचा संकटमोचक एबी डिव्हिलियर्सला त्याने राहुलकडे झेल देण्यास भाग पाडत त्याला बाद केलं. तीन महत्त्वाचे फलंदाज गमावल्यानंतर बंगळुरूचं कंबरडं मोडलं होतं. त्यानंतर तळातील फलंदाजांना काही धावा करता आल्या नाहीत. त्यातल्या त्यात हर्षल पटेलने आकर्षक फटकेबाजी केली, त्यालाही शमीने बाद केलं.

त्याआधी पंजाबकडून कर्णधार के. एल. राहुलने शेवटपर्यंत तग धरत नाबाद 91 धावांची खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्यासोबतच गेलनेही 46 धावा केल्या आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या हरप्रीतनेही 25 धावांची छोटेखानी खेळी केली. त्यासोबतच क्षेत्ररक्षण करताना त्याने एक झेलही पकडला.

दरम्यान, आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बंगळुरूची सुरूवात मात्र काही खास अशी झाली नाही. सलामीवीर देवदत्त पड्डीकल लवकर बाद झाला. त्यानंतर विराट लयीत आल्यासारखा वाटत होता. मात्र पंजाबच्या हरप्रीत ब्रारने एका षटकात सामना काहीसा झुकवला, त्या लागोपाठ विराट कोहली आणि मॅक्लवेलला बाद  केलं. त्यानंतर पुढच्या षटकात खतरनाक एबी डिव्हीलीअर्सलाही बाद केलं. हरप्रीत ब्रार हा सामन्याचा सामनावीर ठरला.

 

थोडक्यात बातम्या- 

ए नया पंजाब है! पंजाबने विराटच्या बंगळुरूचा केला पराभव

मास्कसंदर्भात नव्या सूचना, प्रत्येकाला ‘या’ सूचना माहितच असायला हव्यात!

“केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असतं का?”

हाही काळ निघून जाईल, पुढे सोन्याची झळाळी निश्चित येईल- उद्धव ठाकरे

“नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे थांबवावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More