बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदेंच्या बंडाबाबत उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याने केला मोठा गौप्यस्फोट!

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करत शिवसेना फोडली आणि शिवसेेना पक्षाला आता इतिहासात जमा होण्याची वेळ आली. त्यामुळेच शिवसेना पक्षाच्या पुनर्बांधणीची वेळ शिवसेनेवर आली आहे. त्याकरीता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यात आता शिवसेना कशी फूटली? शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे यांनी बंड का केले? त्यांच्यामागे कोणाचे अदृश्य हात आहेत? हे प्रश्न अजून अनुत्तरीतच होते. आता त्याबाबत उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याने मोठा गौप्यस्फोट केलाय.

शिवसेनेचे निकटवर्तीय आणि विश्वासू समजले जाणारे हर्षल प्रधान (Harshal Pradhan) यांनी यावर भाष्य केलं आहे. शिवसेनेत मोठी बंडखोरी होणं, ही भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट आहे, असं खळबळजनक वक्तव्य हर्षल प्रधान यांनी केलं आहे. ते प्रसार माध्यमांसोबत बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी वारंवार म्हंटलं होतं. भाजपला शिवसेना (Shivsena) संपवायची आहे. आता त्यांनी शिवसेनेच्याच लोकांना हाताशी धरुन शिवसेनेचा गळा घोटला, असं प्रधान म्हणाले.

भाजपला (BJP) बंडखोरांना मोठं करायचं नाही. ते त्यांचा वापर करुन घेत आहेत. त्यांची गरज संपली की ते त्यांना अडगळीत टाकून देतील, असं प्रधान म्हणाले. आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला असं भाजपला लोकांना भासवायचं आहे. भाजपने एकाच वेळी 40 जणांची दिशाभूल केली. भाजपच्या थापांना भुलून सगळे भाजपसोबत जरी गेले असले तरी त्यांच्या मनात आजही शिवसेना आहे, असं प्रधान म्हणाले.

शिवसेनेत बंडखोरी होणार असल्याचं वृत्त मी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कानावर घातलं होतं. पण त्यांनी हर्षल असं होणार नाही, म्हणत आमदारांवर आणि शिवसैनिकांवपर आंधळा विश्वास ठेवला. याचाच फायदा घेत, त्यांच्या पाठीत खंजीर खूपसून शिंदे आणि आमदारांनी त्यांच्याशी दगा केला, असं प्रधान म्हणाले.

थोडक्यात बाचम्या –

संधी सोडू नका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक झटका!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट

प्रसिद्ध गायक अदनान सामीनं उचललं धक्कादायक पाऊल!

‘बंडखोरांची राजकीय तिरडी उठवणारच’; संजय राऊत आक्रमक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More