Top News

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आमदार हर्षवर्धन जाधवांना अटक!

मुंबई | मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा या मागणीसाठी मंत्रालयाशेजारी आंदोलन करणारे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना मुंबई पोलीसांनी अटक केली आहे.

जो पर्यत सरकार मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेश काढत नाही तो मी मंत्रालयाशेजारील गांधीजींच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला होता. आणि आंदोलनाला बसले होते.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या पक्षातील आमदरांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी हर्षवर्धन जाधव मुंबईत आले होते. पण बैठकीपुर्वीच औरंगाबादेत आणखी एका तरूणाने आत्महत्या केल्याचं समजताच त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-…तर सरकारला राज्य चालवणं अवघड होईल; जानकरांचा इशारा

-आत्महत्येपुर्वी प्रमोद पाटलांनी केला होता आईला फोन; वाचा काय म्हणाले

-घटनादुरूस्ती नेमकी कशी करावी, हे शरद पवारांनी स्पष्ट करावं- प्रकाश आंबेडकर

-फेसबुकवर पोस्ट लिहून मराठा मोर्चेकरी प्रमोद पाटीलने केली आत्महत्या!

-…म्हणून त्या दोघांचं चक्क आयसीयूमध्येच लग्न लावलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या