बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांत खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना निवडणुकीत उभं केलं होतं”

औरंगाबाद | वादग्रस्त वक्तव्य आणि गौप्यस्फोट करण्यावरून नेहमीच चर्चेत असणारे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 2019 लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘एआयएमआयएम’चे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंनीच निवडणुकीत उभं केलं पण त्यांचा हा प्रयोग फसला आणि त्यांच्याच अंगलट आला असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत खैरेंनी निवडणुकीला धार्मिक रंग देण्यासाठी इम्तियाज जलील यांना निवडणुकीत उभं केलं होतं असं गंभीर वक्तव्य जाधव यांनी केलं आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे भाजपचे केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. स्वत:च्या सासऱ्यांनाही हर्षवर्धन जाधव यांनी उघडपणे आव्हान केलं आहे.

“पुढच्या निवडणुकीत दानवेंना जर घरी बसवलं नाही तर मी एका बापाची औलाद नाही”, असं हर्षवर्धन जाधव यांनी खुलं आव्हानच रावसाहेब दानवेंना केलं आहे. त्यामुळे दानवे-जाधव हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 2009 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर हर्षवर्धन जाधव आमदार झाले आणि नंतर काही पक्षांतर्गत कुरबुरीमुळे त्यांनी पक्ष सोडला आणि शिवसेनेत प्रवेश केला.

2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुक हर्षवर्धन जाधवांनी अपक्ष म्हणुन लढल्या पण त्यातही त्यांना यश आलं नाही. नव्याने 2019 लोकसभा निवडणुकीबाबत केलेल्या मोठ्या वक्तव्यावरून सध्या चर्चांना उधाण आलं आहे. जेलमधील आपले दिवस हे तावुन सुलाखून काढणारे म्हणजेच परिक्षा घेणारे होते असंही ते यावेळी म्हटले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील”

मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, …तर पेट्रोल-डिझेलची किंमत निम्म्या होतील?

संजय राठोडांचा पाय खोलात, पूजाला दिलेल्या गिफ्टबॉक्सचे ‘हे’ धक्कादायक फोटो व्हायरल

त्यांनी गर्दी जमवली नाही, शिवसेनेच्या मंत्र्याला शिवसेनेच्याच मंत्र्याकडून क्लीनचिट!

आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची मागणी!

 

 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More