पुणे महाराष्ट्र

इंदापुरातून सुळेंनाच आघाडी; दिलेला शब्द पाळण्याची काँग्रेसकडे परंपरा- हर्षवर्धन पाटील

पुणे | संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होणार? सुळे जिंकणार? की कांचन कुलांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार? याची सर्वाधिक चर्चा होत असताना काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी सुळेंचं आत्मविश्वास वाढवणारं वक्तव्य केलं आहे.

इंदापुरातून सुप्रिया सुळेंना 40 ते 45 हजारांपेक्षा जास्त लीड मिळणार आहे. त्यातून माझ्या जिल्हा परिषद गटातून त्यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दिलेला शब्द पाळण्याची काँग्रेसकडे परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा, असं वक्तव्य करत हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना आगामी विधानसभेच्या गणिताची तर आठवण करून दिली नाही ना…? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

इंदापुर, बारामती, भोर आणि पुरंदर या तालुक्यातून सुप्रिया सुळेंना मोठं मताधिक्य भेटणार आहे आणि याच मताधिक्याच्या जोरावर त्या प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-मोदींनंतर साध्वींवर नितीश कुमारही नाराज

-बंगालमध्ये तुफान राडा, भाजप उमेदवाराच्या गाडीची तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

-चंद्राबाबू नायडूंनी 24 तासात दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट! हालचालींना जोरदार वेग

-महत्वाच्या क्षणी सोनिया ‘फ्रंटफूट’वर! या पक्षाने काँग्रेसला दिला निकालाआधी पाठिंबा

-मोदींनी ध्यानधारणा केलेल्या गुहेत राहण्यासाठी तुम्हीही करु शकता बुकींग; त्यासाठी मोजावे लागतील ‘एवढे’ पैसे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या