पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्याबद्दल हर्षवर्धन पाटलांकडून मोठे खुलासे!

मुंबई :  हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र काँग्रेसला रामराम ठोकताना महाराष्ट्र काँग्रेस नक्की कोण चालवतंय, हेच कळत नसल्याची टीकाही केली.

एकेकाळचे सहकारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयीचं मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलं. पृथ्वीराज चव्हाण हे निर्णय घ्यायला वेळ लावतात, अशी टीका त्यांनी केली तर अशोक चव्हाण बैठ्या राजकारणात तरबेज आहे मात्र जनतेच्या राजकारणात ते कमी पडतात, असं ते म्हणाले.

पक्षावर निष्ठा असली तरी पक्षाच्या नेत्यांनाही कार्यकर्त्यांवर निष्ठा ठेवावी लागते. कारण शेवटी जनता वाढवते. माझ्यावर होत असलेला अन्याय इंदापुरच्या जनतेला सहन झाला नाही. त्यांनी मला निर्णय घ्यायला भाग पाडलं, असं ते म्हणाले.

मी निष्ठेला महत्व देणारा माणूस आहे. आता भाजप जी जबाबदारी मला देईल, ती मी निष्ठेने पार पाडील, असं पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-