बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…हे बेणं म्हणजे 2029 चा आमदारच म्हणा ना”

मुंबई | आपण सासू- सुनेच्या भांडणाच्या गोष्टी अनेक वेळा ऐकल्या आहेत. पण राजकारणात जावई आणि सासऱ्यामध्ये असलेला वाद सर्वश्रूत आहे. हा वाद म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातला. हर्षवर्धन जाधव अनेक वेळा रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप करताना दिसतात. आता पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या मुलाचं कौतुक करत रावसाहेब दानवेंवर बोचरी टीका केली आहे.

शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला, हे बेणं म्हणजे 2029 चा आमदारच म्हणा ना, असं म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवेंना सणसणीत टोला लगावला आहे. ते कन्नड मतदारसंघात आयोजित एका सभेत बोलत होते.

इथे आई आहे, इशा  पण बसली आहे, म्हणून शब्द सांभाळतो. पण ते काय म्हणाले.. नाक घासडत आणला नाही तर नावाचा नाही अमका-तमका नाही. पुण्यातील जेलमधून बाहेर पडल्यावर मीही म्हणालो, तुम्हाला ठोकला नाही, तर नावाचा हर्षवर्धन नाही. तुम्ही आमच्या तालुक्यात झेंडे लावता आणि तुमच्या पोरीची बॅग धरायला लावला. मेलो तरी चालेल, पण आता झुकणार नाही, असा इशारा हर्षवर्धन जाधवांनी रावसाहेब दानवेंना दिला.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात रावसाहेब दानवेंची मुलगी संजना जाधव यांनी पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल उभं केलं होतं. पण संजना जाधव यांचा मुलगा आदित्य जाधवनं आपल्या आईच्या विरोधात पॅनल उभा केलं. आपल्या वडिलांच्या नावानं अधिकृत पॅनल घोषित केलं होतं. परंतू या दोन्ही पॅनलचा महाविकास आघाडीने पराभव केला होता. आदित्याच्या या धाडसाबद्दल त्याचं कौतुक केलं गेलं.

थोडक्यात बातम्या-

सर्वसामान्यांना मोठा दिलासा; वीज बिलासंदर्भात अजित पवारांनी सभागृहात केली ‘ही’ मोठी घोषणा

भाजप नेते प्रविण दरेकरांना मोठा धक्का; वाचा काय आहे प्रकरण

धक्कादायक! भररस्यात घडलेल्या ‘या’ घटनेनं पुणे हादरलं

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी महागला

पोलिसांत तक्रार केल्यामुळे मुलीच्या वडिलांना घातल्या गोळ्या; हाथरसमधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More