मुंबई | विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र आता महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर वारे वेगळ्या दिशेने वाहू लागल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यानंतर काँग्रेसला रामराम करून भाजपत प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील शिवबंधनात अडकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
काँग्रेसमध्ये असताना हर्षवर्धन पाटील यांनी कायम शरद पवार घराण्याला आव्हान दिल्याचं पहायला मिळालं. इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांचा दबदबा देखील आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचं पहायला मिळालं. मात्र त्यांचा पराभव झाला. याआधीच्या विधानसभेत देखील हर्षवर्धन पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
ट्रेंडिंग बातम्या-
अजूनही मला विश्वास बसत नाही, माझाही फोन टॅप केला असावा; नाथाभाऊ कडाडले
“भाषेचे भान राहुद्या नाहीतर फुकट शोभा होईल, तुम्हाला आमचा प्रेमाचा सल्ला”
महत्वाच्या बातम्या-
माझ्या जीवाला धोका आहे असं म्हटलंच नाही; आव्हाडांच स्पष्टीकरण
काँग्रेसच्या मार्गाने गेलो असतो तर देशाने कधीच प्रगती केली नसती- नरेंद्र मोदी
हेलिकॉप्टर घ्यायचंय तेही कष्टाच्या पैशातून- रोहित पवार
Comments are closed.