औरंगाबाद महाराष्ट्र

“रावसाहेब दानवे म्हणजे मोठ्या माणसाचा पदर धरून पुढे आलेले गावगुंड”

औरंगाबाद | औरंगाबाद येथील शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार संघटनेतील कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. नुकतंच या आंदोलनाला रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली.

रावसाहेब दानवे यांचं कर्तृत्व शून्य आहे. मागे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे तर आता नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादावर ते निवडून येतात, असं म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे मोठे होतात तसेच ते पुढे आले आहेत. यामुळे सत्ता कधीच जाणार नाही या अविर्भावात त्यांचे वर्तन असते. यातूनच त्यांचे शेतकरी विरोधातील विधान असून त्यांनी शेतकऱ्यांची तत्काळ माफी मागावी, अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. जर दुपारी 4 वाजेपर्यंत माफी मागितली नाही, तर आम्ही पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु, असा इशारा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

थोडक्यात बातम्या-

 शरद पवार UPA ला फायदा करुन देतील, पण …- पंकजा मुंडे

‘या’ जिल्ह्यात पुढच्या 3 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता!

भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

फिटनेस चाचणीमध्ये रोहित शर्मा पास; ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

‘काँग्रेसला संपवण्याचा हा एक मोठा कट आहे’; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या