बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजना नाही तर आता ‘या’ माझ्या जोडीदार- हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | संजना जाधव या माझी पत्नी म्हणून कन्नड-सोयगाव मतदारसंघात फिरत आहेत. ज्या पतीला तुम्ही हा माणूस बरोबर नाही असं म्हणताय, त्याच्या नावाने फिरणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचं कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

तुम्ही अत्यंत वाईट पद्धतीनं मला त्रास देत आहात. ग्रामपंचायत निवडणुकीतही तुम्ही तुमच्याच मुलाविरोधात पॅनल उभा केला. आता पुन्हा मतदारसंघात फिरत असताना तुम्ही संजना हर्षवर्धन जाधव म्हणून फिरत आहात. हा घाणेरडेपणा आहे, असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं.

राजकारणासाठी, स्वार्थासाठी माणूस किती खाली पडू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण म्हणून संजना जाधव आहेत. मी मतदारसंघातील तमाम नागरिकांना सूचना करतो की, माझ्या जोडीदार आता ईशा आहेत, असंही जाधव यांनी म्हटलं आहे. मध्यंतरी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मला आणि ईशाला माझ्या मातोश्रींनी आशीर्वाद दिले आहेत. अशास्थितीत संजना या हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी म्हणून फिरत असतील तर ही लाजिरवाणी बाब आहे. त्यात कुणीही समाविष्ट होऊ नये. संजना यांनी संजना दानवे म्हणून नक्की फिरावं, असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव सध्या त्यांच्या सहकारी ईशा झा यांच्यासह मतदारसंघात दौरे आणि मेळावे करत आहेत. दुसरीकडे संजना जाधवही राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. संजना जाधव या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा सत्कार समारंभात दिसून येत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक आक्रमक आणि हिंसक होते”

चेअरमन, सोसायटीवर लक्ष ठेवा, अन्यथा…; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरीच्या आयुक्तांचा महत्त्वाचा इशारा

#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

…तर मग सचिवाला मंत्री बनवा तुम्ही राजीनामा देऊन टाका- चित्रा वाघ

ठरलेल्या दिवशीच MPSC परीक्षा घ्या- अमित ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More