बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हर्षवर्धन पाटील यांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट; सरकारकडे केली ही महत्वाची मागणी

सातारा | भाजप नेते आणि मराठा आरक्षण समन्वय समितीचे सातारा जिल्हा निमंत्रक हर्षवर्धन पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास वेळ चर्चा झाली.

मराठा आरक्षण, पद्दोन्नती आरक्षणाबाबत राज्य सरकारने तातडीने मार्ग काढावा, अन्यथा समाजा- समाजात तेढ निर्माण होवू शकतो. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं होतं. आता आरक्षणाला वेळ लागत असेल तर मराठा समाजातील मुला-मुलींच्या नोकरी आणि शैक्षणिक सुविधेसाठी काही पर्यायी व्यवस्था करता येते का हे सरकारनं तातडीने पाहावं अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली.

2014 साली पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यात थोडेफार काही बदल केले आणि ते आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं. याचिकेकर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले. दोन महिन्यापूर्वी निकाल लागला आणि मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी हर्षवर्धन पाटील दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते सर्व पक्षीय मराठा नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मंगळवारी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती.

थोडक्यात बातम्या- 

‘मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही- देवेंद्र फडणवीस

मी पुराव्यांसह सांगतोय, कोरोनामुळे झालेल्या मृत्युसाठी मोदीच जबाबदार- असदुद्दीन ओवैसी

‘तुझ्या बापाला’ म्हणत किशोरी पेडणेकरांचं नेटकऱ्याला रोखठोक उत्तर!

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

‘या’ राज्याने 12 वीच्या बोर्डाची परीक्षा केली रद्द; विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची- मुख्यमंत्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More