पुणे महाराष्ट्र

“अनैसर्गिक गोष्ट फार काळ टिकत नाही, महाविकास आघाडीचं सरकार अंतर्गत कलहातून पडणार”

पुणे | हे सरकार अनैसर्गिकरित्या निर्माण झालं आहे. तसेच अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळणार असल्याचा दावा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे मतदान केलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाविकास आघाडी सरकारनं वर्षभरात कोरोना काळात कोणतीही मदत केली नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानांतर कसल्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाच्या मुद्यावर अराजक माजलं आहे. कोरोना, अतिवृष्टी, आरक्षण अशा सर्वच विषयांवर हे सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळं या सरकारच्या विरोधात कौल देण्यासाठी म्हणून ही निवडणूक उत्तम व्यासपीठ आहे, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.

विधानपरिषद निवडणुकीत सरकारमधील कलह समोर आले आहेत. सरकारच्या प्रतिनिधींना बदल्या करण्यामध्येच रस असल्याची टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय

‘मी काय मूर्ख आहे का?’, मतदान केंद्रावर ‘या’ कारणामुळं बिचुकलेंचा संताप

“आपल्यावर शेतकऱ्यांचं कर्ज आहे, लाठ्या-काठ्या, अश्रुधुराच्या माऱ्याने ते फिटणार नाही”

“आता शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?” 

बॉलिवूड उत्तर प्रदेशला हलवण्याचा प्लॅन?; चंद्रकांत पाटलांची महत्त्वाची प्रतिक्रिया

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या