“प्रामाणिकपणे काम करायचं असेल तर राज्यात आणि देशात भाजपशिवाय पर्याय नाही”

मुंबई | इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने सोडण्यास नकार दिल्याने काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

सध्याच्या परिस्थितीत निष्ठा, तत्त्व आणि प्रामाणिकपणे काम करायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. मी कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईमधील गरवारे सभागृहात पक्षप्रवेश केला.

मी तत्त्वाने वागणारा असून आमच्यासारख्या व्यक्तींसाठी आता भाजप हाच एकमेव पर्याय आहे, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-