पानिपत | प्रसिद्ध हरियाणवी गायिका हर्षिता दहियाची गोळी मारुन हत्या करण्यात आलीय. पानिपतजवळच्या इसराना गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली.
म्युझिक कंपनी चालवणाऱ्या दोन मित्रांसोबत हर्षिताचा काही दिवसांपासून वाद सुरु होता. त्यावर तिनं फेसबुक लाईव्हही केलं होतं.
दरम्यान, फेसबुक लाईव्ह हटवण्यासाठी हर्षिताला धमकीचा फोन आला होता. यावरही तिनं फेसबुक लाईव्ह करुन धमकी देणारंचं नाव आणि फोन नंबर जाहीर केला होता. पोलीस आता याआधारे तपास करत आहेत.
Comments are closed.