महायुतीत वादाची ठिणगी; ‘या’ बड्या नेत्याचा थेट अजित पवारांना दम

Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच सध्या महायुतीत महाभारत सुरु आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच जागा वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

इंदापूर मतदारसंघावरून मोठा वाद सुरू झाल्याचं दिसत आहे. ज्यासाठी पक्ष सोडला त्याच मुद्द्यावरून पुन्हा पक्ष सोडण्याची वेळ हर्षवर्धन पाटलांवर आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनसन्मान यात्रेतून इंदापूरात मोठी ताकद दाखवली. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे.

मला अडाणी समजू नका- हर्षवर्धन पाटील

इंदापूर च्या विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा ही तालुक्यापूर्ती मर्यादित राहिली नाही. राजकीय वातावरणावर महाराष्ट्रात चर्चा आहे. इंदापूर तालुक्यात बदल होणार आहे, हे नागरिकांनी ठरवलं आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणालेत.

राजकारणात 40 वर्षे झालीत, मला अडाणी समजू नका, असा खणखणीत इशाराच त्यांनी नेतृत्वाला दिला आहे. उद्याची निवडणूक लढवायची की नाही हा प्रश्न आहे. उद्याच्या आमदारकीच्या निकालापेक्षा दहा वर्षे काही नसताना सोबत राहिली, ते निष्ठावन्त सोबत आहेत. म्हणून आज वेगळी ताकद निर्माण झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

“सर्व गोष्टी सहन करेल अपमान सहन करणार नाही”

राष्ट्रवादीची यात्रा आली ते जे बोलले हा महायुतीचा धर्म आहे का? जागा वाटप व्हायचं आहे. कुणाला कुठलं जागा मिळायची हे बाकी आहे. अजित पवारांना जाहीर प्रश्न विचारतो. तुम्ही इंदापूरमध्ये येऊन काय सांगितलं. देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मी मान्य करणार असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. तरीही, त्यांनी इंदापूरमध्ये येऊन जाहीर काय केलं. इंदापूर च्या जनतेला दुखावण्याचा अधिकार नाही. हर्षवर्धन पाटील सर्व गोष्टी सहन करेल अपमान सहन करणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

सगळ्यांचे फोन येत आहेत. याचा अर्थ काय घ्याचा तो घ्या. मी कुणाला होकार दिलेला नाही. जी चर्चा लोकसभेच्या वेळी झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी मैत्री आहे. त्यांना भेटणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या पहिल्या पत्नीचा धक्कादायक खुलासा!

सगेसोयऱ्यांचा मुद्दा ‘या’ नेत्यामुळे रखडला?, जरांगे पाटलांनी घेतलं राज्यातील सर्वात मोठ्या नेत्याचं नाव?

बीएसएनएलच्या ‘या’ प्लॅननी उडवली Jio, Airtel ची झोप; कमी पैशात मिळणार बऱ्याच सेवा

तुम्ही लवकर उठता तो तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; सुप्रियाताईंनी दादांच्या डायलॉगचा घेतला समाचार

महाविकास आघाडीला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात…; शिंदे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान