बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मृतदेहांवरून राजकारण कसं करावं हे माणसातील गिधाडांकडून शिकावं”

नवी दिल्ली | काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कोरोनासंदर्भातील आकडेवारीवरुन टीका केली होती. अमेरिकेतील न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्राचा दाखला देत आकडे खोटं बोलत नाहीत पण भारत सरकार बोलतं असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता.

न्यू यॉर्कमधील या वृत्तपत्राने भारत सरकार सांगत असलेले करोनाचे आकडे आणि प्रत्यक्षातील आकड्यांमध्ये तफावत असल्याचा दावा केला होता. यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

मृतांच्या नावाने राजकारण करणं काँग्रेस पक्षाची पद्धत आहे. सध्या झाडांवरील गिधाडं दिसत नसले तरी, त्यांच्यातील ऊर्जा जमीनीवरील गिधडांमध्ये नक्कीच आली आहे. त्यांच्या ट्विटवरून असं लक्षात येतं कि त्यांना दिल्लीपेक्षा न्यू यॉर्कवर अधिक विश्वास आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील या गिधडांकडून शिकावं, असं डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी वारंवार केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतात.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या भेटीला

“सरकार टिकवणं ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही”

महाराष्ट्रात काळ्या बुरशीचा धोका वाढला; गेल्या 24 तासातील आकडेवारी धक्कादायक

पुढील दोन दिवसांत राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 2 मॉडेल्सची सुटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More