Top News औरंगाबाद महाराष्ट्र

‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असं खैरे नेहमी करतात, त्यांनी आता निवृत्ती घ्यावी- हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | रविवारी देशांत असलेल्या बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसोरांविरोधात मनसेने महामोर्चा काढला होता. मनसेच्या या महामोर्चामध्ये मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव दिसले नाहीत. यावर हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आजारपणाचं कारण एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला.

उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार चंद्रकांत खैरै नेहमी करतात. त्यांचंं आता वय झालंय त्यामुळे त्यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असा सल्ला हर्षवर्धन जाधवांनी दिला आहे.

खैरेंनी राजकारणापासून लांब राहून नव्या मुलांना संधी द्यावी. आता निवांत राहून नातवंडांसोबत आनंदात दिवस घालवायचे खैरेंचे दिवस आहेत, असा टोला हर्षवर्धन जाधवांनी खैरेंना लगावला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंबाबत बोलताना, आपली विचारसरणी काय आहे हे ठरवणं आवश्यक आहे. ते राज ठाकरेंनी सांगितलं आहे. राज ठाकरेंनी जे काय उभं केलंय ते नक्कीच समर्पित भावनेनं उभं केलंय, असंही हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

आघाडीच्या काळातले अपूर्ण प्रकल्प तात्काळ पूर्ण करा- छगन भुजबळ

उदयनराजेंवर चाहत्याचं निस्सीम प्रेम; अमित शहांना लिहिलं रक्तानं पत्र!

महत्वाच्या बातम्या-

छत्रपती शिवाजी महाराजांवर लवकरच हॉलिवूड चित्रपट

फिर एक बार केजरीवाल; पुन्हा दिल्लीकरांची साथ ‘आप’लाच

भाजप 55 जागा जिंकणार; मतमोजणीपूर्वी भाजप नेत्याचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या