नंदुरबार | मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव नंदुरबारमध्ये दाखल झाले आहेत. मध्यरात्रीच मराठा मोर्चाच्या स्वयंसेवकांनी त्यांचं स्वागत केलं.
नंदुरबारचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंद विरोधात पत्रकार परिषद घेतली होती. तसेच नंदुरबार बंद करुन दाखवा, असं आव्हान दिलं होतं.
हर्षवर्धन जाधव यांनी ते आव्हान स्वीकारलं. त्यांनी रात्रीच नंदुरबार गाठलं. आपल्याच पक्षाच्या नेतृत्वावर तसेच पक्षावर त्यांनी यासंदर्भात टीका देखील केली. आज नंदुरबार बंद करुन दाखवणार असा पण त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-#MaharashtraBandh | मराठा समाजाकडून ‘महाराष्ट्र बंद’ला सुरुवात
-नंदुरबारला निघालोय, बघू कुणात हिंमत आहे मराठा आंदोलन रोखायची?- हर्षवर्धन जाधव
-सुधीर गाडगीळांमुळेच सांगलीत आम्हाला भरघोस मतदान झालं- चंद्रकांत पाटील
-लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना अशोक गायकवाड देणार आव्हान?
-उद्या ‘महाराष्ट्र बंद’च राहणार; मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय