बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“25 वर्ष सुरू असलेलं दानवाच्या राज्याचे रूपांतर रामराज्यात आपण करू”

औरंगाबाद | केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात असलेला वाद हा जगजाहीर आहे. राजकीय तसेच वैयक्तिक जीवनात एकमेकांवर टीकेची एकही संधी हे दोघे सोडत नाहीत. अशातच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक जालना लोकसभा मतदारसंघात लावल्यामुळे त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

‘जनतेची इच्छा असेल तर गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या दानवाच्या राज्याचे रूपांतर रामराज्यात आपण करू’, असं म्हणत त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्या विरोधातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता दानवे विरुद्ध जाधव हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावून त्यावर ती इशा झा यांचा देखील फोटो पाहायला मिळाला. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले असतानाच हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्या विरोधातच निवडणुक लढू असं म्हटल्यामुळे सासरे विरुद्ध जावई अशी लढत येणार्‍या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सासरे जावयामध्ये नेमके काय खटके उडतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण; पाहा आजचा दर?

कोणता निर्णय कधी घ्यायचा हे या सरकारला कळत नाही- गोपीचंद पडळकर

…तर महाराष्ट्रात चमत्कार होईल- संजय राऊत

मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक

“मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा नाही झाली तर काय होईल हे सांगायची गरज नाही”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More