Top News

हर्षवर्धन पाटलांची अजित पवारांवर खोचक टीका; म्हणतात…

Loading...

मुंबई | अजित पवारांचं माझ्यावर फारच प्रेम आहे, असं म्हणत नुकतेच भाजपवासी झालेल्या  हर्षवर्धन पाटीलयांनी चिमटा काढला आहे. ते ‘ABP माझा’शी बोलत होते.

इंदापूरच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने राज्याचे माजी सहकार आणि पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप पक्षात दाखल होताच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली आहे.

Loading...

गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी मदत केली. त्यांना इंदापुरातून ७१ हजार लीड मिळालं. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते माझ्या घरी येऊन गेले आणि विधानसभेत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. मात्र नंतर काय झालं? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला.

मी पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना मला माझ्या तिकिटाचा पत्ता नव्हता. त्यामुळे भांबावून जायचो. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे नेतेही स्पष्ट भूमिका घेत नव्हते. सोनिया गांधीही लक्ष घालू असं फक्त आश्वासन दिलं. मात्र पुढे काही घडलं नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

Loading...

सध्या महाराष्ट्रातली काँग्रेस कोण चालवतंय तेच कळत नाही, अशी टीकाही हर्षवर्धन पाटील यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या