भाजपवाल्यांना आता साईबाबांची झोळीदेखील कमी पडायला लागली आहे!

अहमदनगर | भाजपवाल्यांना साईबाबांची झोळीदेखील कमी पडली आहे, असा घणाघात काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. ते श्रीगोंद्यातील नागवडे कारखान्याच्या 45 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. 

शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी येणार भक्त दान करतात, अन्नछत्र चालवतात. मात्र राज्य सरकारने मोदींच्या दौऱ्यासाठी साई संस्थानकडून 3 कोटी रुपये घेतले. ही लाजीरवाणी बाब आहे, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

भाजपवाल्यांना साईबाबांची झोळी देखील कमी पडलीय. ते जनतेला काय देणार?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अमृतसर रेल्वे अपघातामुळे देश सुन्न; आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू

-…तो शासन निर्णय ‘ऊसतोड कामगार महामंडळा’चा नव्हे तर ‘सुरक्षा योजने’चा?

-पंकजाताई, दिवस मावळला… कुठं आहे ऊसतोड कामगार महामंडळ?

-दसऱ्याच्या मुहूर्तांवर हर्षवर्धन जाधवांनी केली नव्या पक्षाची स्थापना!

-राष्ट्रवादीच्या सरपंचावर गावकऱ्याचा लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या