बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्येही मराठा आरक्षण लागू झालं पाहिजे- हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | राज्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये मराठा आरक्षण लागू होणं गरजेचं आहे, असं कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी समाजाने केलेला त्याग, काढलेले मार्चे, केलेली आंदोलनं या संपूर्ण संघर्षाचा हा विजय आहे, असं हर्षवर्धन जाधवांनी म्हटलं आहे.

केंद्राच्या युपीएससीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांमध्ये देखील हे आरक्षण लागू होणं गरजेचं आहे. यासाठी केंद्रात देखील मराठा आरक्षण टीकलं पाहीजे आणि त्यासाठी लोकसभेत कायदा केला तरच त्याची व्याप्ती वाढेल, असं हर्धवर्धन जाधव म्हणाले.

दरम्यान, आपण एक लढाई जिंकलो आहे आणि आता आपली दुसरी लढाई केंद्रात आहे, असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून भारतीय संघ बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम हरेल!

-अजित पवारांची सावली असलेला ‘हा’ नेता राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत

-…म्हणून महेंद्रसिंग धोनीचं होतंय जोरदार कौतुक

-भारतीय संघाचा विजयरथ सुसाट; विंडीजचा १२५ धावांनी धुव्वा

-“मराठा आरक्षणाबाबतचा उच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More