Top News देश

राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांचा आश्चर्यजनक दावा, म्हणाले…

नवी दिल्ली | दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेले 18 दिवसांपासून नविन कृषी कायद्याच्याविरोधात आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यतसिंह चौटला यांनी काल 12 डिसेंबर रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी एक आश्चर्यजनक दावा केला.

कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकऱ्यांशी सरकार येत्या 24 ते 48 तासांत चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची अपेक्षा आहे, असा दावा प्रसार माध्यमांशी बोलताना चौटला यांनी केला आहे.

भेटीनंतर प्रतिक्रिया देताना चौटला  म्हणाले की, “शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. मी केंद्रीय मंत्र्यांसमवेत शेतकरी आंदोलनावर, त्यांच्या मागण्यांवर केंद्रीय मंत्र्यांबरोबर चर्चा केली. मला आशा आहे की चर्चेद्वारे प्रश्न सोडवला जाईल. केंद्र सकारात्मक आहे”.

दरम्यान, ’14 डिसेंबर रोजी संपूर्ण देशाच्या डीसी कार्यालयात आमचं निषेध आंदोलन असेल. आमचे प्रतिनिधी 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत उपोषणास बसतील. आमच्या मागण्या म्हणजे केंद्राने पारित केलेले 3 कायदे रद्द करावेत. आम्ही सरकारशी बोलण्यास तयार आहोत. हे 3 कायदे रद्द होईपर्यंत चौथ्या मागणीकडे आम्ही जाणार नसल्याच संयुक्त किसान आंदोलनाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

होय, मी घरी बसून काम करत होतो, म्हणूनच….; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

“लव्ह जिहादच्या नावाखाली परदेशातून फंडिंग, हिंदू मुलींची लावतात बोली”

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमात केक खाण्यासाठी उडाली झुंबड; पाहा व्हिडीयो

“काँग्रेसच्या ‘या’ नेत्यामुळे शरद पवारांचं पंतप्रधानपद हुकलं”

‘…तर तुम्हाला आज धनंजय मुंडे दिसला नसता’; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या