“हरियाणात भाजपचा प्रशासनावर दबाव, खरी आकडेवारी..”; कॉँग्रेसचा गंभीर आरोप

Haryana Elections Results 2024 | हरियाणा विधानसभा निवडणुकांचा निकाल आज 8 ऑक्टोवर रोजी जाहीर होत आहे. आज सकाळपासूनच येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हरियाणात भाजप सध्या 48 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे. यादरम्यानच काँग्रेसने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. (Haryana Elections Results 2024)

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजप पिछाडीवर होता. मात्र, आता आलेल्या आकडेवारीनुसार भाजप बहुमताच्या जवळ येऊन पोहोचला आहे. त्यामुळे हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अशात, कॉँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

हरियाणात भाजपची आघाडी

मतमोजणीची ताजी आकडेवारी अपडेट करत नसल्यामुळेच भाजप आघाडीवर दिसून येत आहे. हा भाजपचा माईंड गेम आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट बघत असल्याचं देखील जयराम रमेश यांनी म्हटलंय. (Haryana Elections Results 2024)

मतमोजणीच्या आतापर्यंत 11 ते 12 फेऱ्या पार पडल्यात. पण, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चौथ्या आणि पाचव्या फेरीचे निकाल दाखवले जात आहेत. त्यामुळे भाजप आघाडीवर दिसत आहे. हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार असून लोकसभा निकालावेळी देखील असंच घडल्याचा दावा जयराम रमेश यांनी केलाय.

कॉँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीन ते साडेतीन वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रांवर थांबून राहावे. खेळ अजून संपलेला नाही. कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, असा सल्ला जयराम रमेश यांनी दिलाय. तर, सुप्रिया श्रीनेत यांनीही काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. अंतिम आकडेवारी येईल, तेव्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झालेले असेल, असे सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं. (Haryana Elections Results 2024)

दरम्यान, हरियाणामधील 90 जागांसाठी 464 अपक्ष आणि 101 महिलांसह एकूण 1,031 उमेदवार रिंगणात आहेत. मागील दहा वर्षांपासून हरियाणा येथे भाजपची सत्ता आहे. हरियाणामध्ये काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीशिवाय जेजेपीही निवडणुकीच्या रिंगणात आहे. समोर आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार हरियाणात भाजप 48 जागांवर, काँग्रेस 36 जागा, लोक दल 4 आणि अपक्ष उमेदवार हे 4 जागांवर आघाडीवर आहेत.

News Title : Haryana Elections Results 2024

महत्वाच्या बातम्या-

माता सीतेशी स्वतःची तुलना, अभिनेत्री करीना कपूरवर संतापले नेटकरी

‘कोकण हार्टेड बॉय’ नेमका कोण?’ अंकिता वालावलकरने सांगितला लग्नाचा प्लॅन

अजित पवारांना धक्का, कट्टर समर्थक लढवणार अपक्ष निवडणूक?

PM किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळाला नाही? मग येथे करा थेट तक्रार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसची गरजू महिलांसाठी मोठी घोषणा!