बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रौप्य पदक मिळवत इतिहास रचणाऱ्या रवीकुमार दहियावर बक्षिसांचा वर्षाव; 4 कोटी, गावात स्टेडियम अन्…

नवी दिल्ली | भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहियाने ऑलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. रवीकुमारचा अंतिम सामन्यात पराभव झाला त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. रवीकुमार कुस्तीमध्ये भारतासाठी रौप्य जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. रवी कुमारच्या यशाचं देशभरात कौतुक होत आहे. अशातच हरियाणा सरकारने त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला आहे.

4 कोटींची रक्कम, नोकरी, गावात स्टेडियम आणि राज्यात कुठेही रवीच्या इच्छेप्रमाणे तो सांगेल त्या भागात 50 टक्के सवलतीमध्ये जमीन असा बक्षीसांचा वर्षाव हरियाणा सरकारने आपल्या सुपुत्रावर पाडला आहे. रवीकुमारचा सर्व देशवासियांंना अभिमान आहे.

रवी कुमारमुळे त्याच्या गावाचंही नशिब पालटणार आहे. त्याच्या गावात कुस्तीसाठी विशेष इनडोअर स्टेडियम उभारलं जाणार आहे. रौप्यपदक विजेत्याला चार कोटी रुपये सरकारकडून देण्यात येणार असल्याची ऑलिम्पिकपूर्वीच केली होती. गावात स्टेडिअम उभारत असल्यामुळे इतर तरूणांना त्याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, रवी कुमार अगोदर भारतासाठी रौप्यपदक जिंकणारा पहिला मान सुशिल कुमारने मिळवला होता. त्याने 2012 साली पहिलं रौप्यपदक मिळवून दिलं होतं. रवी कुमारचं देशभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्याचं अभिनंदन केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हा’ पॅक त्वचेला लावा आणि मिळवा सुंदर त्वचा!

सुवर्ण पदक हुकलं पण भारतीयांचं ह्रदय जिंकलंस! अंतिम लढतीत रवीकुमार दहियाचा पराभव

मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मुंबईप्रमाणे जगभरातही पूरस्थिती, तिथल्या महापालिका आमच्या हातात नाहीत- उद्धव ठाकरे

पुण्यात राष्ट्रीय खेळाडु वैष्णवी ठुबेला मारहाण; रुपाली पाटील म्हणाल्या,कार चालकास अटक करा अन्यथा…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More