नवी दिल्ली | केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या कृषी कायद्यामुळे गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवरील आंदोलन सुरु आहे. याची झळ आता हरियाणा सरकारलाही बसू लागली आहे.
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जननायक जनता पार्टी (JJP) ने शेतकरी आंदोलनावर मोठे वक्तव्य केलं आहे. हरियाणा सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी दुष्यंत चौटाला असेपर्यंत शेतमालाच्या एमएसपीवर कोणतेही गंडांतर येऊ देणार नाही. जर शेतकऱ्यांना एमएसपीवर नुकसान झाले तर चौटाला तात्काळ राजीनामा देतील, असा इशारा जेजेपीने दिला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी देखील जेजेपीने केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
…तर उत्तर प्रदेशात मायानगरी आपोआप निर्माण होईल; शिवसेनेचा योगी आदित्यनाथांना टोला
“अमेरिका जगाला एकत्रही ठेवू शकला नाही, जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम”
मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच निर्णय घेऊ- उद्धव ठाकरे
“शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह”