बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Second Dose घेतलाय का?; ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

मुंबई | कोरोनाने (Corona) गेल्या वर्षभरात जगभर थैमान घातलं होतं. आता कोरोनावर एकमेव प्रभावी उपाय असलेली लसीकरण (Vaccination) प्रक्रिया पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अशातच आता कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या Omicronने जगाचं टेंशन वाढवलं आहे. त्यामुळे आता लसींच्या दोन्ही डोस (Second Dose) देण्यावर जोर देण्यात येतोय. अशातच ठाकरे सरकार (Thackeray government) आता मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे.

महाराष्ट्रात लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात होता. मात्र, गेल्या काही दिवसात देशासह महाराष्ट्रात लसीकरणाचं प्रमाण घटल्याचं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. लसीचा तुटवडा नसताना देखील आता लसीकरणाचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून येतंय.

अनेक जणांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याचं दिसत नाही. त्यावर आता राज्य सरकार कठोर पावलं उचलणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. दुसरा डोस न घेणाऱ्यांवर काही बंधनं आणण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

दरम्यान, दोन्ही लसींच्यामध्ये 84 दिवसांचा कालावधी मर्यादीत करण्यात आला होता. त्यामुळे आता लस न घेणाऱ्यांची संख्या जवळपास दीड ते पावणे दोन कोटी असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिक दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत असल्याने आता राज्य सरकार कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

थोडक्यात बातम्या-

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

…म्हणून शिवसेनेला अधूनमधून शेण खायला संज्या लागतो – निलेश राणे

शुभमंगल सावधान! अखेर विकी-कतरिना अडकले लग्नबंधनात

“शरद पवारांचं ठरलंय, 2024 मध्येही उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करायचंय”

शेतकरी आंदोलन अखेर मागे! मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या पाच मागण्या मान्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More