बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांत पाटील पलंगावरून पडले तरी, त्यांना सरकार पडल्यागत वाटत असेल”

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. विरोधी पक्ष भाजपकडून ठाकरे सरकार पडणार असल्याचं वारंवार सांगण्यात येतं. याच पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

दोन वर्ष संपत आली महाविकास आघाडी सरकारला, महाविकास आघाडी सरकारन अनेक कामं केली आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील अस्वस्थ झाले आहेत. चंद्रकांत पाटील हे पलंगावरून जरी खाली पडले तरी त्यांना महाविकास आघाडी सरकार पडलं असं वाटत आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

सर्व नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. जिल्ह्यात भविष्यात मित्रपक्षांकडून कोणता तोडगा निघाला नाही तर राष्ट्रवादी दहा विधानसभा मतदारसंघाता निवडणूक लढवणार असून तरूणांना अधिक संधी दिली जाईल, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी पाटलांवर केलेल्या टीकेवर पाटील काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

भारताला धक्का! पॅरालिम्पिकमधील विनोद कुमारांचं कांस्यपदक काढून घेतलं

आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन घेऊन जाणं होणार सोपं, पाहा व्हिडीओ

धोनीच्या नेतृत्वात विश्वचषक खेळलेल्या ‘या’ खेळाडूने घेतला तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय !

शिवसेनेच्या पाठीमागं ईडीचं शुक्लकाष्ठ! अनिल परबांनंतर ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची छापेमारी

ह्रदयद्रावक! शेतकऱ्यावर आली उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More