बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांच्या प्रकृतीवर केलेल्या टीकेबद्दल भाजपने ‘माफी’ मागावी, नाहीतर…- हसन मुश्रीफ

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यावरून भाजपच्या आयटी सेलने या शस्त्रक्रियाचा संबंध सचिन वाझे प्रकरणाशी यांच्याशी जोडला होता. यावर दिल्लीतील काही भाजप नेत्यांनी आणि काही नेटकऱ्यांनी शरद पवारांवर विकृत लिखाण केलं होतं. यावरून ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी कडक शब्दात भाजपला इशारा दिला आहे.

शरद पवार यांच्या आजारपणावर केली गेलेली टीका ही फार दुर्देवी आहे. भाजपने दिलगिरी व्यक्त करून हे थांबवावं. दोन दिवसात दिलगिरी व्यक्त केली नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही बोलायला लागलो तर त्यांच्या कुठून कुठून कळा येतील बघा,  अशा शब्दात हसन मुश्रीफ यांनी भाजपच्या आयटी सेलवर आणि भाजप नेत्यावर टीका केली आहे.

भाजप नेते नविन कुमार जिंदल यांनी एक ट्विट केलं होतं. सचिन वाझे यांनी तपास यंत्रणेला काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागलं. त्यांना रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. मला तर वाटतं, ‘दाल मे कुछ काला नही है , पुरी दाल ही काली है’, असं नविन कुमार जिंदल म्हणाले होते.

दरम्यान, शरद पवार यांच्या आजारपणाविषयी सोशल मीडियावर हीन दर्जाची पोस्ट करणाऱ्या विकृतांवर कारवाई केली जाणार आहे. सायबर क्राईम विभागाकडे अशा युझर्स विरोधातच तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली होती.

थोडक्यात बातम्या-

पठ्ठ्या एक लाख रूपये किलोनं विकतोय ‘ही’ भाजी; वाचा देशात कुठे होतंय उत्पादन

लग्नाच्या दीड महिन्यानंतर बेबी बम्पसह फोटो शेअर करत दियाने दिली गुड न्यूज!

BCCI चा उद्धटपणा; विराट कोहलीने केलेल्या त्या टीकेला BCCI चं प्रत्युत्तर

धक्कादायक! मुलानं आत्महत्या केली तिथेच आईनेही आयुष्य संपवलं

अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचं कॅनडामध्ये निधन!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More