बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भविष्यात असे राज्यपाल येतील असं बाबासाहेब आंबेडकरांनाही कधी वाटलं नसेल”

अहमदनगर | विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या नियुक्तीवरुन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे.

राज्यपालांनी विधानसभेचे 12 आमदार लटकवून ठेवले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने चांगल निकाल दिला आहे. भविष्यात असे राज्यपाल येतील असं बाबासाहेब आंबेडकरांनाही कधी वाटलं नसेल, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी ते बोलत होते.

एका कार्यक्रमामध्ये आमदार विनय कोरे यांनी विचारण केली त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, माझं देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांचं बोलणं झालं आहे. आपलं सरकार येत नाही तोपर्यंत नियुक्ती करायची नाही. यावरून राज्यपालांवर दबाव आहे हे स्पष्ट होत असल्याचं मुश्रीफ म्हणाले. भाजप किती दबाव आणणार?, अशाने राज्यपालांची प्रतिष्ठा खराब होईल, असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेले 9 महिने झाले राज्यपालांनी निर्णय घेतला नाही. ती यादी तुम्हाला आवडली नसेल तर पुन्हा पाठवा. आम्ही परत पाठवू पण निर्णय घ्या. होय किंवा नाही म्हणा, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

“उद्धव ठाकरे सुसंस्कृत नेते पण धुक्यात त्यांनी भलत्याच व्यक्तीचा हात धरला”

“महाराष्ट्रात असा वणवा पेटवू की त्याची धग दिल्लीत पोहोचली पाहिजे”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे हे आमचे नेते, माझं त्यांच्यावर खूप प्रेम- दत्तात्रय भरणे

‘बचपन का प्यार’ गातानाचा रानू मंडलचा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More