कोल्हापूर महाराष्ट्र

माझ्या सुनांना स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपल्या सासऱ्याच्या घरावर छापा पडेल!

कोल्हापूर | माझ्या घरावर आयकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे. या झाडाझडतीत कपाटं विस्कटली, गाद्या फाटल्या. माझं कौटुंबिक जीवन अस्ताव्यस्त झालं आहे. माझ्या सुनांना देखील कधी आपल्या सासऱ्याच्या घरावर धाड पडेल असं वाटलं नव्हतं, असं राष्ट्रवादीचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

‘सर्किट हाऊस’मध्ये राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रवादीतून सध्या बरेच नेते भाजप-शिवसेनेत स्थलांतर करत आहेत. यावर बोलताना, शरद पवारांना या वयात सोडून जाणं योग्य नाही. जहाज बुडत असताना अगोदर उंदरं उड्या मारतात, तसं सध्या पक्षात सुरू आहे, असं मतं मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, आयकर विभागाच्या कारवाईवर बोलताना, सरकारी कामकाज सुरू आहे. ते चालू राहू द्या, यावर आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असंही मुश्रीफ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-राजीनाम्याच्या निर्णयानंतर चित्रा वाघ सोशल मीडियावर ट्रोल!

-रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीनं दिली बढती; ‘या’ महत्वाच्या पदावर निवड

-एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये जाणार???; ‘या’ नेत्याचा दावा

-आत्तापर्यंत 20 जणांचा पवारांना रामराम तर ‘हे’ 9 जण सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत!

-खरं बोललो तर जीवाला धोका- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या