Top News

“…लायकी नसताना शरद पवारांसारख्या नेत्यावर आरोप करू नये”

कोल्हापूर | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी इथल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. मात्र या पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार होतं. मात्र त्यापूर्वीच पडळकरांनी हे अनावरण केलं. यावेळी बोलताना पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली होती. या टीकेला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

गोपीचंद पडळकर आणि खोत यांची लायकी काय? लायकी नसताना त्यांनी पवारांसारख्या नेत्यावर आरोप करू नये. सत्ता नसल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. म्हणूनच केवळ शरद पवार साहेबांचं नाव खराब करण्यासाठी भाजप नेते आरोप करत आहेत, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांना आवरावं नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देखील हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिला. लायकी नसलेली माणसे सध्या जास्त बोलत आहेत त्यामुळे, कोणीवरही टीका करताना स्वतःचे आत्मपरीक्षण करावं, असा सल्लाही हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्याबाबत तपास सुरू आहे, तपास पुर्ण होईपर्यंत कोणतेही वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही. विरोधकांनीही सरकार अस्थिर करण्यासाठी बिनबुडाचे आरोप करु नयेत, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

अजित पवारांनी मान्य केली अजित यशवंतरावांची ‘ती’ मागणी, दिले 1.09 कोटी!

‘मला माझ्या नवऱ्याकडं जायचंय’, चिमुकलीच्या बालहट्टाने तुम्हीही पोट धरून हसाल; पाहा व्हिडीओ

‘हा’ नेता सत्तेत असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही- विनायक मेटे

“मराठा-धनगर एकत्र आल्यास, दिल्लीची गादी हस्तगत करु”

…तर आज काश्मिरी तरुण IAS आणि IPS अधिकारी असते- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या