बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माणसं जगली का मेली ते तरी बघायला या- हसन मुश्रीफ

कोल्हापूर | ज्या कोल्हापूर जिल्ह्यानं पदवीधरच्या निवडणुकीत दोन वेळा आमदार केलं, नंतर ते मंत्री झाले, कोल्हापूरचे ते भूमीपूत्र आहेत. त्यांनी कोरोनामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांना लगावला.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि डॉक्टर असोसिएशन यांच्यावतीने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना फेस शील्डचे शासकीय विश्रामगृहावर वितरण करण्यात आलं. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलंय.

चंदकांत पाटील यांची मी मुलाखत पाहिली आहे. यामध्ये दोन तीन वेळा कोल्हापूरचा उल्लेख आला आहे. गेल्या 50 दिवसात कोल्हापूरची माणसं काय करत आहेत, ती जगली का मेली हे सुध्दा बघायला पाटील आलेले नाहीत, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर निशणा साधला आहे.

दरम्यान, आम्ही सत्तेवर असतो तर यापेक्षा अधिक चांगलं काम केलं असतं असं म्हणणाऱ्या पाटील यांनी पहिल्यांदा कोल्हापुरात यावं. सर्व पातळ्यांवर कोल्हापूर जिल्ह्यात कसं चागलं काम सुरू आहे ते पहावं, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

प्रवासी मजुर आणि फेरीवाल्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!

शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या-

PM केअर फंडामधून तब्बल ‘एवढ्या’ कोटींचं वाटप तर व्हेंटिलेटरच्या खरेदीसाठी 2000 कोटी- PMO कार्यालय

‘रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला’; आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका

शंभूराजांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली याचा मनोमन आनंद- जयंत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More