Hasan Mushrif | राजर्षी शाहू महाराज यांची आज (26 जून) 150 वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त कोल्हापूरसह राज्यभरात आणि राजधानी नवी दिल्लीत देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.या पार्श्वभूमीवरच राज्यातील बड्या नेत्याने एक मोठी मागणी केली आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत असल्याचं म्हटलं आहे. आज एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
हसन मुश्रीफ यांनी केली मागणी
“राजर्षी शाहू महाराजांच्या जन्माच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रम करणार आहोत. महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणं, त्यांनी रयतेचं राज्य कोल्हापूरमध्ये कसं उभं केलं हे देशाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.”,असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
“शाहू महाराजांनी आयुष्यभर केलेलं काम, समाजसेवेचं काम, सर्वक्षेत्रात या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी केलेलं काम, विशेषत: समतेचा विचार जगभर पोहोचवण्यासाठी आपण कार्यरत राहूया, हीच राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल.”, असंही मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले.
“राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या”
पुढे त्यांनी थेट केंद्रीय मंत्रीमंडळाकडे महत्वाची मागणी केली. “राजर्षी शाहू महाराजांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्तानं मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना विनंती करतो की राजर्षी शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा.”, अशी मागणीच हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केलीये.
हसन मुश्रीफ यांच्या या मागणीला महाविकास आघाडीकडूनही पाठिंबा मिळाला आहे. छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न देण्याची मागणी कोणी करत असेल तर त्यात टीका करण्यासारखं काही नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
News Title – Hasan Mushrif demanded Bharat Ratna award to rajarshi Shahu Maharaj
महत्त्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी! वनप्लस कंपनीने लाँच केला भन्नाट फीचर्ससह स्मार्टफोन
पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव; ताबडतोब ‘या’ 5 गोष्टींची काळजी घ्या!
पुण्यात ‘झिका’चे रुग्ण आढळल्याने खळबळ, काय आहेत या आजाराची लक्षणं?
पुण्यात झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ
विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी आज मतदान; आता महायुती की महाविकास आघाडी?