बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये, आपलं हसं होऊ नये म्हणून…”

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात वारंवार शाब्दिक चकमकी होताना दिसतात. अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील टोला लगावला होता. याला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. अजित दादा जरा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे. जर बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना दिला होता. यावर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना सल्ला दिला आहे.

चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे. दादांनी आधी छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांना तंबी दिली होती. त्यांचं हे बरोबर नाही. दादांवर आता चांगलं कार्टुन आलं आहे. आपलं हसं होऊ नये म्हणून दादांनी आता अशी वक्तव्य करणं टाळावं, असा सल्ला हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे.

आरोग्य सेवेच्या साहित्य खरेदीतील जीएसटी रद्द करा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादांनी केली आहे. त्यावर या मागणीचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने समिती तयार केली आहे. त्या समितीचे अध्यक्षपद मेघालय सारख्या छोट्या राज्याच्या अर्थ मंत्र्याला दिले. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र मोठं राज्य असताना असा अपमान का केला? केंद्र सरकार सातत्यानं महाराष्ट्राचा अपमान करत आहे, असं देखील हसन मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या वाकयुद्धात अमोल मिटकरी यांनी देखील उडी घेतली होती. औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच दिसतात, अशी टीका मिटकरी यांनी केली होती.

थोडक्यात बातम्या-

‘तुमचा मनसैनिक खचलाय, आता याला तुम्हीच उत्तर द्या’; मनसे पदाधिकाऱ्याची राज ठाकरेंकडे मागणी

ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर

“70 वर्षांत जे कमवलं ते सगळं 7 वर्षात विकायला काढलं”

…म्हणून आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला 1 कोटी रुपयांची नोटीस

मुंबईतील कोरोना आटोक्यात; वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More