Top News आरोग्य

…तर नाईलाजाने डॉक्टरांवर मेस्मा लावाला लागेल, हसन मुश्रीफ यांचा इशारा

देशात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. अशीच परिस्थिती राज्यातंही आहे. राज्यातील परिस्थिती इतकी गंभीर असताना देखील काही खाजगी डॉक्टर रूग्णसेवा नाकारत असल्याचं समोर आलं आहे. अशा डॉक्टरांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कडक इशारा दिला आहे. “रूग्णसेवा देण्यासाठी पुढाकार घ्या, नाहीतर मेस्मा लावण्यात येईल,” असं मुश्रीफ यांनी म्हटलंय.

हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यानुसार, “राज्यातील खाजगी डॉक्टरांनी रूग्णसेवा देण्यासाठी पुढे आलं पाहिजे. जे खाजगी डॉक्टर रूग्णसेवा देण्यासाठी नकार देतील त्यांच्यावर नाईलाजाने मेस्मा कायदा लावाला लागेल. या कायद्याअंतर्गत डॉक्टरांची नोंदणी रद्द करून तुरुंगात पाठवण्याची तरतूद केलेली आहे.”

मेस्मा म्हणजे काय?

मेस्मा म्हणजे महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा. या काद्यानुसार लोकांचं हित लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारचा संप पुकारण्यास मनाई करण्यात येते. त्याशिवाय आदेश झुगारून लावण्याऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. आरोग्यसेवा, दूध, वीज, लोकहिताच्या गोष्टींचा पुरवठा थांबू नये यासाठी या कायद्याचा वापर केला जातो.

“रूग्णाला वाचवण्यासाठी अखेरपर्यंत संघर्ष करा. कोल्हापूरमध्ये राज्याच्या तुलनेत रूग्ण बरं होण्याचं प्रमाण कमी आहे. त्याशिवाय जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कोरोनाची सेंटर्स उभारली आहेत. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांची कमी दिसून येतेय. याठिकाणी एमबीबीएस डॉक्टरांना सरकार दर महिन्याला 60 हजार तर एमडी डॉक्टरांना दोन लाखापर्यंत पैसे देण्यात येत आहेत. मात्र तरीही डॉक्टर रूग्णसेवा देण्यास तयार नाहीत,” असंही मुश्रीफ यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडी सरकारला झटका; ग्रामपंचायत प्रशासकाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय

‘महाराष्ट्र पोलीस’ आम्हाला तुमचा अभिमान आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुण्यात घडलेल्या ‘या’ प्रकारानं पोलिसांची प्रतिमा मलीन; एका पोलिसाचं निलंबन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या