बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझी हात जोडून विंनती आहे की, किरीट सोमय्यांना अडवू नका”

कोल्हापूर | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रूपयांच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. अलिकडेच याप्रकरणावरून किरीट सोमय्यांना कोल्हापूरात जाण्यापासून पोलिसांकडून रोखण्यात आलं होतं. त्यानंतर या घटनेवरून राज्यात चांगलचं राजकीय वातावरण तापलं आहे. आता किरीट सोमय्यांना कोल्हापूरात येऊ देण्याची विंनती खुद्द हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

येत्या मंगळवारी किरीट सोमय्या आपल्या कोल्हापूराच्या पुर्वनियोजित दौऱ्यासाठी येणार आहेत. माझी सगळ्यांना हात जोडून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की, त्यांची कोणीही अडवणूक करू नये, त्यांना शांततेच्या मार्गावर येऊ द्यावं, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी पोलिसांकडे केली आहे.

किरीट सोमय्यांनी माझ्यावर दोन साखर कारखान्यांचे घोटाळेचे आरोप केले आहेत. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण निर्माण झाल्यामुळे सोमय्यांना कोल्हापूरात येण्यापासून प्रतिबंध केला होता. त्यांना शांततेत कोल्हापूरात येऊ द्यावं. तुम्हाला ऐकावंस वाटलं नाही तर टीव्ही बंद करा नाहीतर शेतात जा. जे जिथेही जातील, काहीही बोलतील त्यांना बोलू द्या, असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून किरीट सोमय्या आणि महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय वाद समोर येत आहे. त्यामुळे किरीट सोमय्या कोल्हापूरात जाऊन काय राजकीय गौप्यस्फोट करणार आहेत, त्यांच्याकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून राज्यातील मंदिरं उघडणार; मुख्यमंत्र्यांकडून सुधारित आदेश जारी

जळगावात भाजपला मोठा धक्का! तब्बल ‘इतके’ नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

‘किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर..’; राजू शेट्टीचं किरीट सोमय्यांना आव्हान

युपीएससीचा निकाल जाहीर! बिहारचा शुभम कुमार देशात पहिला, तर पहिल्या शंभरमध्ये महाराष्ट्रातील तिघं

“रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसलेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More