बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इंदोरीकर चांगले कीर्तनकार, मी दोनवेळा त्यांना कीर्तनासाठी घेऊन गेलोय”

अहमदनगर | ह.भ.प. इंदोरीकर महाराज देशमुख यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलांच वादंग पाहायला मिळाला. यावेळी अनेक राजकीय नेते त्यांच्या पाठिशी उभे राहिल्याचंही पाहायला मिळालं. यातच कॅबिनेट मंत्री आणि नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर प्रतिक्रिया किली आहे.

इंदोरीकर महाराज यांच्यावर जे आरोप होत आहेत त्याचं उत्तर ते देतील. मात्र, इंदोरीकर हे चांगले समाज प्रबोधनकार आहेत. मी दोनवेळा त्यांना माझ्या मतदारसंघात कीर्तनासाठी घेऊन गेलो आहे, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी मत व्यक्त केलं आहे.

नगरमधील बैठकीत बोलताना मुश्रीफ यांनी वरील वक्तव्य केलं आहे. इंदोरीकर प्रकरणावरुन राज्यात गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी त्यांचं समर्थन केलं, तर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.

दरम्यान, सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य इंदरोकर महाराजांनी केलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मनसेबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाले….

मालिकेतील कोणताच भाग वगळणार नाही; अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण

महत्वाच्या बातम्या-

“तृप्ती देसाई, तुला कापून टाकीन…”

“मुख्यमंत्र्यांना कोणी तरी समजवावे लागेल, संधी दिली तर मी समजावून सांगतो”

‘त्या’ व्हायरल व्हीडिओबाबत नवाब मलिकांचं स्पष्टीकरण; म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More