‘…तर तुम्ही कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात या’, हसन मुश्रीफांचं भाजप नेत्यांना आव्हान
कोल्हापूर | अधिवेशन आलं की कोरोना होतो हा विरोधी पक्षाचा आरोप चुकीचा आहे. त्यांना जर एवढंच वाटतंय तर त्यांनी कोरोनाबाधित मंत्र्यांच्या संपर्कात यावं, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे.
हसन मुश्रीफ मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य करत भाजप नेत्यांवर सडकून टीके केली आहे.
मुख्यमंत्री आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं आधीच जाहीर केलंय. कोणत्याही चौकशी शिवाय कारवाई करणं चुकीचं होईल धनंजय मुंडे प्रकरणात भाजपची कशी फजिती झाली ते आपण पहिलं आहे, असं मुश्रीफ म्हणाले.
संजय राठोडांच्या राजीनाम्याबाबत मला अधिक माहिती नाही. मात्र मुख्यमंत्री महोदयांच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, अन्…; पाहा व्हिडिओ
‘नक्षलवादी होण्याची परवानगी द्या’; मराठवाड्याच्या शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
‘कॅशियरसोबत फ्लर्टिंग करायचं नाही’; ‘या’ मेड इन पुणे पाटीनं गाजवलं सोशल मीडिया
‘महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे…’; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य
“आम्ही आमच्या घरालाही मोदींचं नाव देऊ, तुमच्या पोटात का दुखतंय”
Comments are closed.