कोल्हापूर महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर…- हसन मुश्रीफ

कोल्हापूर | चंद्रकांत पाटील यांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी झाला आहे, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केलीये.

उद्धव ठाकरे यांचा जन्म सरकार चालवण्यासाठी नव्हे तर संघटना चालवण्यासाठी झाल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा हसन मुश्रीफ यांनी जोरदार समाचार घेतलाय.

भाजपकडून केवळ राजकारण केले जाते. मात्र, भाजपच्या टीकेमुळेच आम्ही घट्ट एकत्र आलो. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे त्यांना सत्ता न मिळाल्यामुळे दु:खी आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरं मूल जन्माला घातलं नाही”

100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट रद्द!

“महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय”

“तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही”

राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारचा निर्णय

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या