कोल्हापूर महाराष्ट्र

चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे- हसन मुश्रीफ

कोल्हापूर | पुणे असं आहे की इथं प्रत्येकाला सेटल व्हावं वाटतं. पण मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेष करून मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुंश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय.

चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतलाय. सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. तसेच परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलावलंही नव्हतं, असं अजित पवार म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरुड मतदार संघ निवडला त्याचवेळी त्यांच्यावर टीका झाली होती. आता पाटलांनी कोल्हापूरला परत येणार असल्याचं वक्तव्य केलंय.

थोडक्यात बातम्या-

“धरणवीर उपमुख्यमंत्री जास्तच बोलू लागलेत, हिंमत असेल तर…”

‘…तर देशातील राज्यं फुटतील’; संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

“सरकारकडे विकासासाठी पैसा नाही पण निवडणुका जिंकण्यासाठी, सरकारे पाडण्या-बनवण्यासाठी पैसे आहे”

मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची प्रकाश आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या