कोल्हापूर महाराष्ट्र

पुराचा धोका ओळखून मंत्री हसन मुश्रीफांच्या जिल्हा प्रशासनाला या तातडीच्या सूचना

कोल्हापूर | जिल्ह्यामध्ये गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या मुरगुड व परिसरातील गावांमध्ये पुराचा धोका वाढल्याची माहिती समजताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाशी तातडीने संपर्क साधत मुरगूड व परिसरासाठी अत्याधुनिक बोटिंसह पुण्याहून एनडीआरएफची टीम तातडीने रवाना केली. कागलच्या तहसील तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनाही तातडीने या ठिकाणी भेट देण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली आहे.

गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसाने आलेल्या पुराच्या पाण्यामुळे जवळपास बेटाचे स्वरूप आले आहे. निपाणी – राधानगरी राज्यमार्गावर मुरगुडनजीक पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला आहे. सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर पाणी आल्याने मुरगुडपासून दौलतवाडी व पुढे कापशीचा संपर्क तुटला आहे. तसेच मुरगुड -कुरनी, भडगाव तसेच मुरगूड – वाघापूर दरम्यानचे मार्गही पुरामुळे बंद आहेत. पावसाचा जोर असाच राहिला तर परिस्थिती अधिकच भीषण होणार आहे.

मुरगुड व परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामधून जवळपास चार ते पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहर व परिसरातील लोकांमध्ये प्रचंड घबराट होऊ लागली आहे. आदमापुर येथील बाळूमामा भक्तनिवास याठिकाणी कोवीड केअर सेंटर निर्माण केले असले, तरी महापुरामुळे मुरगूडचा संपर्क तुटला आहे. त्यामुळेच शिवराज महाविद्यालय याठिकाणी 10 ऑक्सिजनच्या बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे अत्यवस्थ रुग्णांवर याच ठिकाणी उपचार करणे शक्‍य होणार आहे.

लवकर पुढे या…. लवकर बरे व्हा-

याचबरोबर कोरोना सदृष्य लक्षणे आढळताच नागरिकांनी तातडीने तपासणी करून घेण्याची गरज आहे. वेळीच उपचार झाले तर हा आजार नियंत्रणात राहू शकतो. दुखणं अंगावर काढून वेळाने उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे हे गांभीर्य वेळीच ओळखून नागरिकांनी स्वतःसह आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी. तसेच महापुराच्या परिस्थितीत अत्यंत महत्वाचे व अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच रहा व सुरक्षित राहा, असं आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी दिलं आहे.

कायमस्वरूपी ॲम्बुलन्सची उपलब्धता-

मुरगूड परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावेत, तसेच पुढील उपचारासाठी रुग्णाचे हाल होऊ नयेत म्हणून कोवीड केअर केअर सेंटर येथील एक जादाची ॲम्बुलन्स मुरगूड येथे कायमस्वरूपी उपलब्ध ठेवली असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

संयम ठेवलाय म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजपचा सवाल, ‘संयम सुटला तर काय कराल?’

चीनमध्ये नव्या व्हायरसचा धुमाकूळ; तब्बल इतक्या लोकांना झालीय ‘या’ व्हायरसची लागण

जेव्हा कमळाचं राज्य येईल तेव्हाच…., राम मंदिर भूमीपूजनावर शत्रुघ्न सिन्हा यांचं ट्विट!

आदिवासी मुले, महिलांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या