कोल्हापूर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच मोठं पॅकेज जाहीर करेल. हे पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रासाठी 50 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करावं, या आणि अन्य मागण्यांसाठी भाजपने माझं अंगण, माझं रणांगण, महाराष्ट्र वाचवा हे आंदोलन सुरु केलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या या मागणीवरुन हसन मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
केंद्राने 20 लाख कोटी जाहीर केलं मात्र हे कसलं पॅकेज आहे? सगळं कर्जच आहे. पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा नाही. आमचं महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असं मोठं पॅकेज देईल की भाजपचे डोळे पांढरे होतील, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कसं अडचणीत येईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. जीएसटीचे 12 हजार कोटीची थकबाकी द्यायची होती. आज मी आकडा घेतला साडेपाच हजार कोटीची थकबाकी यायची आहे. चालू तर सोडूनच द्या, असं मुश्रीफ म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
आज कोरोनाचे 2940 नवीन रुग्ण; पाहा तुमच्या भागात किती?
…तर महाराष्ट्रानं भाजपची पाठ थोपटली असती; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले
महत्वाच्या बातम्या-
…तर तुमचं नेटफ्लिक्सचं अकाऊंट बंद होऊ शकतं
निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही- रोहित पवार
हा शिवसेना नेता राज्यपालांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Comments are closed.