बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्यानं केंद्राची पुनावालांना तंबी, म्हणून ते लंडनला गेले”

अहमदनगर | पुण्यात असलेली सीरम कंपनीचे प्रमुख अदर पुनावाला यांनी जूनपासून दीड कोटी कोरोना लसी देण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना केंद्र सरकारने तंबी दिली आणि ते लंडनला जाऊन बसले, असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय. ते अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

कोरोना लसींचं सर्व नियंत्रण केंद्राने आपल्या हातात घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, केंद्र सरकार 45 वर्षांवरील ते करणार आणि 18-44 वयोगटातील राज्यांनी करावं असं सांगत आहे हे बरोबर नाही. आम्ही ग्लोबल टेंडर काढलं. कोरोना लसीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 हजार कोटी रुपये एकरकमी देण्याची तयारी केली. असं असूनही कुठलीही लस उत्पादक कंपनी आमच्यासोबत बोलायला तयार नाही. या कंपन्या म्हणतात की आम्ही केंद्र सरकारसोबत बोलू, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात तयार होणारी कोरोना लसही आपल्याला दिली जात नाहीये. एकीकडे हे राज्यांना लसीकरण करायला लावतात. दुसरीकडे लस उत्पादकांना धमक्या द्यायच्या ही पद्धत बरोबर नाही, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.

कोरोना लसींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय धोरण आखावं. असं झालं तर 6 महिन्यात संपूर्ण लसीकरण होईल. आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे. त्यातील 10 वर्षांची मुलं सोडली तर बाकीच्यांना आपण दोन डोस कसे देणार याची व्यवस्था केंद्राने करावी, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

आपापल्या भागातील परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासनाने निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा- उद्धव ठाकरे

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

‘या’ जिल्ह्यात 2 आठवड्यात कोरोना रुग्णांची तब्बल 13 कोटींची लूट; तपासणीत धक्कादायक माहिती आली समोर

महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार आगमन

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More