बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या राज्य सरकारमधील मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचारांच्या आरोपांची खैरात करताना दिसत आहेत. किरीट सोमय्या यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचा मुलगा नाविद मुश्रीफ यांनी 127 कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप सोमय्या यांनी मुश्रीफ पितापुत्रांवर केला आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचे खंडण करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. सोमय्या यांनी माझ्यावर केलेले मनी लॉन्ड्रींगचे आरोप खोटे आहेत. माझ्या मालकीच्या सर्व कंपन्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. माझ्यावर याआधी आयकर विभागाची धाडी पडल्या होत्या, पण त्यामध्ये काहीच सापडलं नाही, असं म्हणत मुश्रीफांनी आरोपांचे खंडण केलं आहे.

ज्यादिवशी कारखान्याचे लायसन्स मिळालं त्यादिवशी लोकांनीच 17 कोटी रूपये जमा केले. मी येणाऱ्या दोन आठवड्यात कोल्हापुरात किरीट सोमय्या यांच्यावर फौजदारी कारवाई करत 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील आपण रस्ते घोटाळ्याच्या चौकशीसाठी तक्रार लाचलुचपत विभागाकडे करणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.

दरम्यान, किरीट सोमय्यांना काहीही माहिती नाही. सोमय्या यांना चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनीच माहिती दिली आहे. सोमय्या यांनी कोल्हापूरमध्ये येवून माहिती घ्यायला हवी होती. तसेच त्यांना हवी त्या ठिकाणी तक्रार करावी, असंही मुश्रीफ म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या –

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

कुंभाराने बनवलेल्या मटक्याने सर्वांचीच झाली पंचायत, आता सारं गाव…, पाहा व्हिडीओ

कोरोना काळात रक्ताचा मोठा तुटवडा, टाटा रुग्णालयाने केलं महत्त्वाचं आवाहन

एका दुचाकीवर डझनपेक्षा जास्त मुलांचा गोंधळ, पाहा व्हिडीओ

“बलात्कार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंग करू”

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More